पोस्ट्स

हृदयाची तार छेडणारं गाणं : कदले कदले

इमेज
        सध्या OTTचा जमाना आहे. दिवसेंदिवस नवनवीन सिनेमा व वेब मालिका येतायत. पण त्यातील खूपच कमी हृदयाला स्पर्श करतात आणि हृदयस्पर्शी गाणी तर त्याहूनही कमी. अशाच हृदयस्पर्शी सिनेमांपैकी पैकी एक '96' व त्यातीलच 'कदले कदले'( माझ्या प्रेमा) हे गाणे. हा सिनेमा तमिळ भाषेतला. आपल्या हृदयस्पर्शी कथानकाने व विजय सेतुपतीच्या नैसर्गिक अभिनयाने त्याने भारतातील सर्व सिनेमा प्रेमींच्या मनात भुरळ घातली. इतकेच काय तर त्याचे मराठी, कन्नड व तेलगु मध्ये रिमेकही निघाले आहेत.            सर्वच लोक स्वप्न पाहतात. स्वप्नांसाठी जगतात. जगण्याच्या प्रमुख आधारांपैकी स्वप्न हे एक आहे. हे गाणं असेच एक स्वप्न सांगतंय. स्वप्न....वास्तवाशी हजारपट दूर असलेलं, पण अंतर्मनाला सुखावणारं स्वप्न. या गाण्यातील संगीत अत्यंत हळूवार आहे व तितकाच चिन्मयीचा आवाजही. गाण्याची सुरुवात सुरावटीने होते व बासरीचा मोहक आवाज हृदयाची तरलता दाखवतो. हे सर्व कमीच की काय म्हणून हृदयातील अगदी आतील कोपर्‍याला स्पर्श करणारा आलाप येतो आणि गाण्याचे बोल सुरू होतात.     ...